शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान चे अध्यक्ष एयर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदन साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर यांनी भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली वा शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती केली.

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी त्वरित विनंती पत्र लिहिले असून याबाबत पाठपुरावा करून ह्या वास्तूचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: