शाळांमधून उभे राहणार रामनदी पुनरूज्जीवनाचे बालकार्यकर्ते – चंद्रकांत पाटील

पुणे:- पुण्यातील केवळ मुळा-मुठाच नव्हे तर रामनदी देखील नव्याने बनविण्यात आलेल्या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आली असून प्राधिकरणासाठी सुमारे सतराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आता केवळ पाठपुरावा करुन निधी मिळवणे आणि नद्यांच्या पुनरूज्जीवना्च्या कार्यास गती देणे एवढे कार्य बाकी आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या ह्या क्रांतीकारी प्रकल्पामध्ये  रामनदी पुनरूज्जीवनाचा सिंहाचा वाटा असणार आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.
किर्लोस्कर वसुंधरा अंतर्गत सुरु असलेल्या रामनदी पुनरूज्जीवन कार्याच्या शाळा अभियानस आज पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किर्लोस्कर न्युमॅटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश मिजार, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळंबकर आदी उपस्थित होते. बाणेर येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयातील शिक्षक वृंद, कर्मचारी, स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शैलजा देशपांडे, वैशीला पाटकर, विनोद बोधनकर, नयनीश देशपांडे आणि सुवर्णा भांबूरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
पाटील यावेळी म्हणाले, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम एकट्या दुकट्याचे  नसून त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाचे पाठबळ मिळाल्यास चळवळीला गती मिळेल.नागरिकांमध्ये नद्यांविषयी सजगता वाढवत हा नद्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या अस्तित्वाशी कसे ठेट निगडीत आहे हे प्रबोधनाद्वारे अधोरेखीत केले पाहिजे. प्लॅस्टिक ही देखील मोठी समस्या असून प्लॅस्टिक पासून डिझेल बनवता येते. असे छोटे छोटे प्रकल्प गृहनिर्माण सोसायट्यांच्या पातळीवर तसेच शाळा पातळीवर बसविण्याची गरज आहे. यासाठी माझ्या आमदार निधीतून मी निधी उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. नद्यांचे पुनरुज्जीवनाच्या कार्याची कालमर्यादा आखून घेऊन त्यानुसार कार्य सिद्धिस गेले पाहिजे.
डॉ. सुरेश मिजार म्हणाले, आपण समाजाप्रती काही देणे लागतो ह्याचे जे संस्कार अनेक दशकांपूर्वी शंतनुराव किर्लोस्कर यांनी घालून दिले आहेत. त्या संस्काराला स्मरुन आम्ही ह्या स्वंयसेवी संस्थाशी जोडले जाऊन  नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यात सहभागी झालो आहोत. समाजातील शिक्षक हा घटक संवेदनशील आणि जबाबदर घटक मानला जातो. त्यांच्या मार्फत सांगितली गेलेली गोष्ट संस्करक्षम वयात मुलांच्या मनावर प्रभावी पद्धतीन बिंबवली जाते. त्यामुळे नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यात शिक्षकांची भूमिका मोलाची असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: