fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

नवचैतन्य हास्ययोग परिवार, विजय पटवर्धन फाउंडेशनतर्फे २०० नाट्य व लोककलावंत, तंत्रज्ञाना अन्नधान्य किटचे वाटप


पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि नवचैतन्य हस्ययोग परिवार यांच्या वतीने छोट्या भूमिका करणारे कलाकार, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ अशा सुमारे २०० कलाकारांना अन्नधान्य किट व अन्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या ऑनलाईन हास्य क्लबला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.

शास्त्री रस्त्यावरील निळू फुले कला अकादमीत झालेल्या या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे विजय पटवर्धन, अभिजित इनामदार, राजू बावडेकर, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, प्रमोद ढेपे आदी उपस्थित होते. ज्या कलाकारांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही, त्यांना मदत देण्यासाठी समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन यावेळी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

मकरंद टिल्लू म्हणाले, “कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्याचे नवचैतन्य फुलावे यासाठी हा उपक्रम घेतला आहे. रसिक आणि कलाकारांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून या किटचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात कलाकारांचा कार्यक्रम सोसायटीत ठेवावा. त्याद्वारे या कलाकारांना स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहण्याची संधी निर्माण होईल.” आगामी काळात कलाकारांसाठी विविध डॉक्टरांच्या मार्फत आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी व अन्य उपक्रम घेण्यात येतील, असे विठ्ठल काटे यांनी सांगितले.

विजय पटवर्धन म्हणाले, “लॉकडाऊनमुळे मराठी नाट्यसृष्टीतील कलाकार व पडद्यामागील कलाकार अडचणीत आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून संस्था, प्रतिष्ठित दानशूर व्यक्तीच्या मदतीने अंदाजे ५०० कलाकार व पडद्यामागील कलाकारांना धान्य शिधाकिट, त्यांच्या मुलांना शालेय साहित्य, दुर्गम भागातील तमाशा कलावंत, गोंधळी, कीर्तनकार, बँडमधील कलाकार यांना शिधावाटप केले. पुण्यातील कलाकारांसाठी महानगरपालिकेच्या सहयोगाने कोरोना विरोधी लसीकरण मोहीमही राबवित आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading