fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पानशेत धरणातून खडकवासला धरणात 903 क्यूसकने विसर्ग सुरु


पुणे: हवामान विभागाने राज्यात पुणे लगतच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पानशेत धरणातून संध्याकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातून 903
क्यूसकने विसर्ग सुरू आहे .अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
दरम्यान या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली.
पानशेत धरण 100 टक्के भरले असून वरसगाव धरणही 100 टक्के भरले असून तर खडकवासला धरणात 75 टक्के पाणी साठा आहे
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पानशेत आणि वरसगाव मधून विसर्ग केला जाईल त्यामुळे खडकवासला धरणात कमी पाणी ठेवण्यात आले आहे. अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading