Mission Admission 2021 : अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार सुरू
मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार उद्या (14 ऑगस्ट) पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट पासून अर्जाचा भाग 1 हा भरता यईल. तर 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. अन् 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
- 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशसाठी अर्ज भाग – 1 भरता येणार
- 17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यत प्रवेश अर्जाचा भाग 2 भरता यईल
- 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होईल
- 25 ऑगस्टला अंतिम सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होईल
- 27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल
- पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होतील
- 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांणी पसंतीचे कॉलेज निश्चित करायचे आहेत
- 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर होतील
