Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune Metro – मेट्रोचे शिल्पकार सुरेश कलमाडी यांना ट्रायलच्या वेळी निमंत्रण न देण्याऱ्या पालिकेचा काँग्रेस कडून निषेध

पुणे : शहरात मेट्रो सुरू व्हावी म्हणून पुण्याचे खासदार असताना सुरेश कलमाडी यांनी अतोनात मेहनत घेतली. केंद्राकडून योजना मंजूर करून घेणे, रूटची पाहणी करावयास लावणे, आर्थिक तरतूद करवून घेणे, म. न. पा. मुख्य सभेकडून व महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळविणे, सर्व कार्यालयात दाद मागून प्रकल्प मार्गी लावणे आदी सर्व कामे सुरेश कलमाडी यांनी मार्गस्थ लावली व पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाले. काल वनाज कंपनी, पौड रो ते आयडीयल कॉलनी हा १ ला टप्पा मेट्रो धावली. पुणेकरांना आनंद झाला. काँग्रेस पक्षाला व काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी मेट्रोची पायाभरणी करणारे नेतृत्व त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रण देण्याचे टाळले असे का केले? या त्यांच्या दृष्ट प्रवृत्तीचे पुण्यातील काँग्रेसजन व स्वत: मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जाहिर निषेध करीत आहे असे रमेश बागवे यांनी म्हटले आहे.

पुण्यातील म. न. पा. तील भाजपा नेतृत्वाने मेट्रोच्या प्रकल्पाची सुरवात करणाऱ्या व्यक्तीस व पुण्यातील काँग्रेस नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रीत न करणे हा काँग्रेस नेते, नगरसेवक व स्वत: त्यावेळचे खासदार मा. सुरेश कलमाडी यांचा अपमान केलेला आहे. ही खंत काँग्रेसजन कधीच विसरू शकणार नाही. यांची नोंद पुणे मेट्रो प्रकल्प प्रमुख, महापौर व म. न. पा. पदाधिकारी यांनी घेतली पाहीजे असे स्पष्ट म्हणणे आहे व काँग्रेस जनांना टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा आम्ही पून:श्च तीव्र निषेध करीत आहोत. असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading