Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONAL

योगी-मोदींनी UP ला कुपोषणात नंबर वन बनवले, प्रियांका गांधीचा ट्विटर वरून निशाणा

नवी दिल्ली :उत्तर प्रदेशातील कुपोषणावरून आज शनिवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवले, असे म्हणत प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टीकास्त्र सोडले आहे. आता प्रियंका गांधींच्या या ट्वीटचे भाजपाचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीने उत्तर देणार हे आता पाहावे लागेल.

प्रियंका गांधी म्हणाले की, संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुले (जवळपास 4 लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत. डबल इंजिनची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनवले, अशा शब्दांत प्रियंका यांनी जोरदार टीका केली.

दरम्यान, यापूर्वी ऑक्सिजनच्या मुद्द्द्यावरून प्रियंका गांधींनी सांगितले की, कोरोना संकटाच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत 700 टक्के वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नसल्याचे प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading