Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वेळ आली तर ‘सेनाभवन’ फोडू – भाजप आमदार प्रसाद लाड

मुंबई : भाजपच्या वतीने आज माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं. ‘आम्ही माहिममध्ये आल्यावर शिवसेना भवन फोडण्याची भिती वाटते. घाबरू नका, वेळ आली तर सेनाभवन फोडू,’ असं प्रसाद लाड म्हणाले आहे. त्यामुळे आता प्रसाद लाड यांच्या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे, हे आपण २०१४ निवडणुकीत त्यांना दाखवून दिलं होत. कारण त्यावेळेला जे भाजप होते आणि भाजपला मानणारा जो कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता, तो मतदार आज देखील भाजपसोबत आहे. आतातर सोने पे सुहागा हुआ है. कारण राणे कुटुंबियांना मानणारा देखील स्वाभिमानचा खूप मोठा गट आज राणेच्या निमित्ताने भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला कार्यकर्ते नितेश राणे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलीस खूप येतात. फक्त त्यांना सांगूया, ट्रेसमध्ये पाठवू नका, जेणेकरून आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण तुमची, आमची एवढी भिती की, यांना असं वाटतं, आता हे माहिममध्ये आले म्हणजे हे सेनाभवन फोडणारचं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading