फुकट बिर्याणी ऑडिओ क्लिपचा दोन्ही बाजूंनी तपास सुरू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे : शहरातील डिसीपी आयपीएस प्रियंका नारनवरे यांच्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फुकट बिर्याणीची
ऑडिओ क्लिप आता वेगळ्या प्रकरणात पोहचली आहे. पुणे पोलिस दलातील वसूली प्रकरण याद्वारे चव्हाट्यावर आले आहे. यामुळे संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना दोन्ही बाजू तपासण्याचे आदेश दिले आहेत, त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी दिली.
पुण्यातील एका कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलतांना त्यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजलि अर्पण करत देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते, २५ वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे, त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय, जी कधीच भरून निघणार नाही असे सांगितले.
दरम्यान, काल पुण्याच्या कोरोना आढाव बैठकीत जो निर्णय झाला की पुणे शहर आणि जिल्हा लेव्हल 3 मध्ये आहेत, शिथिलता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून येत्या 1 ते 2 दिवसात शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
