Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

सलमान खानचा ‘भाईजान’ पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार

अभिनेता सलमान खान आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला कॉमेडी चित्रपट  ‘भाईजान’  हा पुढील वर्षी दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे यापूर्वी  ‘कभी ईद कभी दिवाली’  हे नाव ठेवण्यात आले होते. साजिद नादियादवाला निर्मित आणि फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीमध्ये विकेंडला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा यांच्या सोबत आयुष शर्मा, असिम रियाज आणि जहीर इकबाल यांच्याही भूमिका असणार आहेत. सध्या सलमान खान  ‘टायगर 3’ च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. हे शुटींग संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून  ;भाईजान  चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading