Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपशहर प्रमुख आनंद गोयल यांच्यावतीने 1000 ब्लँकेट रवाना

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता पुरग्रस्तांना मदत करावी आणि आपल्या मराठी बांधवांचे अश्रु पुसावेत” असे आवाहन पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. याला सर्वात आधी प्रतिसाद देत आनंद गोयल यांनी 1000 ब्लँकेटची मदत मुंबई शिवसेना भवन येथे पाठवले.

अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना करताना इथल्या आपल्या बांधवाना भावनिक -मानसिक आधाराची गरज असल्याने हि मदत नक्कीच या आपत्तीग्रस्त बांधवांना
दिलासा देईल असे पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
पुढे आणखी अजुन देखील मदत लागल्यास महत्वाच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत आम्ही नक्की करू असे आश्वासन उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी दिले.
यावेळी ही मदत येरवडा येथून पुणे शहरप्रमुख संजय मोरे,शहर समन्वयक सुनील जाधव, शहर संघटक राजाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राजुशेठ अगरवाल विभाग प्रमुख शांताराम (आबा)खलसे, किशोर पाटील, सोमनाथ खांदवे,प्रभाग प्रमुख दशरथ माटवनकर,शंकर संगम,समन्वयक पालाभाऊ मोरे,शाखाप्रमुख अजित शास्त्री,श्रीकांत खांदवे,भूषण जाधव,सा कार्यकर्ते शंकर चव्हाण,संजय मोझे,रमेश थाणगे,विकास नवले, सुरेश कटके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading