Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डा मध्ये अंधाधुंद कारभार

पुणे: खडकी कँटोन्मेंट बोर्डामध्ये गेली कित्येक दिवसांपासून येथील मयत कामगार व मेडिकल अनफिट झालेल्यांच्या मुलांना आज पर्यंत कामावर घेतलेले नाही .फक्त पैशाच्या व्यवहारावर व अन्य मार्गाने कामावर घेतले जात आहे. तरी सर्व कामगारांच्या मुलांना लाड पाणे समिती अनुसार कामावर घेण्यात यावे .अन्यथा एक दिवसीय धरणे आंदोलन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डा समोर केले जाईल. असा इशारा वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मन्युभाई कागडा यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला आहे.

या पत्रकार परिषदेला नंदूलाल नाहरिया अध्यक्ष अखिल मेहतर वाल्मिकी समाज सुरक्षा संघ पुणे,
गोपाळ महेश सोळंकी, प्रमोद मोतीलाल पारचा, राजेंद्र चंडालिया उपस्थित होते.


वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्यच्या मागण्या
1) सन 2015 मध्ये खडकी छावणी परिषदेमध्ये विविध पदांसाठी जाहिरात देऊन भरती घेण्यात आली. व त्या भरती मध्ये अर्जासोबत 50 रुपये डी. डी घेण्यात आले याचा खुलासा करण्यात
यावा.
2) खडकी छावणी परिषदेमधील सफाई कामगारांना वेतन कोणत्या नियमाप्रमाणे दिले जाते केंद्र की राज्य याची माहिती देण्यात द्यावी.
3) खडकी छावणी परिषदेमधील ऑफिस स्टाफ मधील कामगार यांना दुसरा व चौथा शनिवार रविवार सुट्टी दिली जाते कोणत्या नियमाप्रमाणे राज्य व केंद्र माहिती देण्यात द्यावी.

4) खडकी छावणी परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून भरती केले जाते परंतु त्यांना सफाईचे काम न देता ( फक्त नावानि सफाई कामगार म्हणून घेतले
जाते) याचा पण खुलासा करण्यात यावा.
5) खडकी छावणी परिषदमध्ये सफाई कामगार 7 वा मिथुन का दिला गेला नाही याचा खुलासा करावा.
6) खडकी छावणी परिषदेमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये किती कायमस्वरूपी वार्ड बॉय, किती आहे व किती सफाई कर्मचारी यांच्या नावासह खुलासा देण्यात यावा.
7) खडकी परिषदेमध्ये सफाई कामगार क्लास फोर किती जागा रिक्त आहे ही माहिती द्यावी व ती जागा भरण्यात आले नाही याची माहिती देण्यात यावी.
8) खडकी छावणी परिषदेमध्ये सन 2002 मध्ये सफाई कर्मचारी चरणदास कामावर असताना मरण पावले त्यांच्या जागेवर ती वारस म्हणून मुलाला कामावर का घेण्यात आले नाही? गेले पंधरा वर्ष झाले असून याचा देखील खुलासा करण्यात यावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading