Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महापूर – भाजप आमदार देणार एक महिन्याचे वेतन

मुंबई – राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता भाजपने वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजप आमदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आज बुधवारी दिली.

या प्रसिद्धीपत्रकातून आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे. तसेच, पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून मदत केली जाणार आहे. सहा जिल्ह्यातील 16 हजार कुटुंबांना ‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’मार्फत 16 हजार किट्सचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुण आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading