पुणे शहरात गेल्या 24 तासात 327 रुग्णांना डिस्चार्ज तर 250 नवीन रुग्णांची नोंद
पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 250 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 327 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 716 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 74 हजार 193 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8731 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2792 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 231 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6987 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
