Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

पियाजिओ कडून ३०० सीसी बीएस-६ पेट्रोल व सीएनजी वाहनांची आपे एचटी श्रेणी सादर

पुणे पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंनी आणि भारताच्‍या आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने पेट्रोल व सीएनसी इंधन पर्यायांमध्‍ये अद्वितीय ३०० सीसी शक्‍तीची वाहने आपे एचटी रेंज सादर केली. नवीन सादरीकरणे कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

आपे एचटी रेंज पुढीलप्रमाणे:

पेट्रोल कार्गो – आपे एक्‍स्‍ट्रा एचटी

सीएनजी कार्गो – आपे एक्‍स्‍ट्रा एचटी एलडीएक्‍स आणि आपे एक्‍स्‍ट्रा एचटी एलडीएक्‍स+

सीएनजी पॅसेंजर – आपे ऑटो एचटी डीएक्‍स, आपे ऑटो एचटी डीएक्‍सएल आणि आपे ऑटो+ एचटी.

आपे एचटी रेंजमध्‍ये नवीन ३०० सीसी वॉटर-कूल इंजिन आहे. हे एचटी इंजिन सीएनजी व पेट्रोल उत्‍पादनांमधील अधिक शक्‍ती व टॉर्कची गरज असलेल्‍या ग्राहकांना अल्‍टरनेट इंधन इंजिनांचा हाय-टेक अनुभव देण्‍यासाठी आणि त्‍यासंदर्भातील त्‍यांच्‍या गरजांची पूर्तत करण्‍यासाठी पियाजिओने स्‍वत:हून विकसित केले आहे. हे इंजिन कमी आवाज व कंपनासह अत्‍यंत आरामदायी अनुभव देते, ज्‍यामुळे हे शहरी भारतीय मोबिलिटी सोल्‍यूशनचे नेक्‍स्‍ट जनरेशन इंजिन आहे.

आपे एचटी रेंज उच्‍च शक्‍ती व टॉर्कसह अधिकतम भार-क्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ही रेंज एफआय स्‍मार्ट इंजिनामुळे कमी आवाज व कंपनासह सुलभ राइडचा आनंद देते.

पियाजिओ ही तीनचाकी कार्गो विभागामध्‍ये पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट देणारी एकमेव कंपनी आहे. पेट्रोल कार्गो किंमतीसंदर्भात संवेदनशील असलेल्‍या ग्राहकांना किफायतशीर दरातील लाभ देते. पियाजिओ आगामी महिन्‍यांमध्‍ये पॅसेंजर व्‍हेरिएण्‍ट आपे ऑटो एचटी पेट्रोल देखील सादर करण्‍याची योजना आखत आहे.

याप्रसंगी बोलताना पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी म्‍हणाले, ”पियाजिओमध्‍ये आमचा ग्राहकांना दर्जात्‍मक तंत्रज्ञान ऑफरिंग्‍जसह शेवटच्‍या अंतरापर्यंतच्‍या परिवहन विभागामध्‍ये लक्षणीय सोल्‍यूशन्‍स देण्‍यावर विश्‍वास आहे. नवीन ३०० सीसी इंजिन पियाजिओ इटलीच्‍या तंत्रज्ञान पाठबळासह भारतामध्‍ये विकसित करण्‍यात आले आहे. इंजिन भारतातील नवीन अत्‍याधुनिक असेम्‍ब्‍ली लाइनमध्‍ये उत्‍पादित केले जात आहे. ग्राहकांच्‍या अभिप्रायानंतर संकल्‍पनेच्‍या टप्‍प्‍यावर पियाजिओमध्‍ये आम्‍ही पालन करणा-या प्रबळ नवीन उत्‍पादन विकास प्रक्रियेच्‍या आधारावर हे उत्‍पादन आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading