Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘तुझे मेरी कसम’ मधील ‘या’ व्यक्ती बरोबर रितेश देशमुख 20 वर्षांनी करतोय काम

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक आदी चित्रपटांचे चित्रिकरणाची धुरा सांभाळलेले कबीर लाल आता एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अदृश्य असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. तसेच, त्याच्यासोबत पुष्कर जोग, मंजिरी फडणीससुद्धा आहेत.

विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख २० वर्षानंतर पहिल्यांदा काम करत आहेत, रितेशचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते. या विषयी रितेश म्हणतो मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत … सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग बघायला मी गेलो होतो, त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली. कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल की मला ऍक्टर बनायचे आहे, पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच फिल्मने माझ्या फिल्मी करिअरला सुरवात झाली.

रितेश पुढे म्हणतो २० वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी फिल्मचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्याचा मी भाग आहे हि गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्या सह सौरभ गोखले , अनंत जोग , अजय कुमार सिंह हे अभिनेते या चित्रपटात आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे, लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading