कोरोना मुक्त पेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंंद झाली आहे. तर ७ हजार ८३९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत १६५ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं म्हटलं जात असलं तरीही नियमित वाढणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत नाहीय. तर, मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ०८ हजार ७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३० हजार ९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६० लाख ६८ हजार ४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ३७ हजार ७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: