Pune गेल्या चोवीस तासात 289 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज तर 196 नवीन रुग्ण
पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत आहे . मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची कमी-जास्त होत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 196 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 289रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83हजार 844 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 84 हजार 080इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8696जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2855 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 235 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6277स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
