Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

येमूल नंतर इतर ” आध्यात्मिक गुरु ” पोलीसांच्या रडारवर…

पुणे : उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा छळ करण्याचा गुन्हा सध्या पुण्यात गाजतोय. या गुन्ह्यात हाय प्रोफाईल अध्यात्मिक गुरु ” येमूल गुरुजीला ” पोलिसांनी अटक केली. त्यामुळे तर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. त्यातच आता, या गुन्ह्यात आणखी हि काही ” बडे अध्यात्मिक गुरु ” पोलिसांच्या रडारवर आले असल्याची माहीती पुढे येत आहे.

औंध येथील गायकवाड या उद्योजक कुटुंबच्या शोधात सध्या पोलीस आहेत. सुनेच्या अमानुष छळाचा गुन्हा गायकवाड कुटुंबावर दाखल आहे. त्याचबरोबर, खंडणी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवणे, बेकायदा जमीन बळकावणे असे अनेक गुन्हे गायकवाड यांच्यावर दाखल आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, सुनेचा पायगुण चांगला नाही. सून घरात राहील्यास पती गणेश याला राजकारणात यश येणार नाही. तसेच लिंबू – मिरची , टाचण्या याचा वापर सुनेवर करण्यात आला. असा गुन्हा देखील गायकवाड कुटुंबावर दाखल करण्यात आला आहे.
हाय प्रोफाईल येमूल गुरुजी याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. जामीनावर येमूल गुरुजी सध्या बाहेर आहे. अघोरी प्रथांचा वापर आणि सुनेचा छळाला कारणीभूत ठरल्याचा आरोप येमूलवर आहे.

जादू – टोणा विरोधी कायद्यांतर्गत देखील येमूलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येमूल गुरुजीला झालेल्या अटकेमुळे या गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले आहे. इतर काही तथाकथित अध्यात्मिक गुरू देखील गायकवाड कुटुंबला मार्गदर्शन करत होते. हि बाब पोलीस तपासात पुढे आली असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यस्तरावर प्रभावक्षेत्र असलेल्या ” गुरूंचा ” यात समावेश असल्याचे समजते आहे. अनेक भक्त अध्यात्मिक ” गुरूंना ” आपले “माउली” मानतात. भक्तांची अशा गुरूंवर गाढ श्रद्धा असते. मात्र, हि श्रद्धाच पुढे जाऊन अंधश्रद्धा बनते का. भक्तांना केलेले मार्गदर्शन भक्ताला आणि गुरूंनाही अडचणीत आणते का, असा प्रश्न गायकवाड प्रकरणामुळे पुढे आला आहे.

गायकवाड यांच्याकडे ही अशा गुरूंचा राबता होता, अशी माहीती पुढे येतेय. येमूल प्रमाणेच इतर अध्यात्मिक गुरूंचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे का ? त्यांनी गायकवाड यांना या गुन्ह्यामध्ये मदत केली आहे का ? याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी गंभीरपणे तपास केल्यास अनेक गुरूंची पोलखोल होण्याची शक्यता आहे.
येमूल गुरुजींमुळे आणखी काही अध्यात्मिक गुरु पोलिसांच्या रडारवर आलेत, हे नक्की. पोलीस त्यांचा माग कशापद्धतीने काढतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

या विषयी बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख म्हणाले, एखाद्या अध्यात्मिक गुरूने किंवा बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीने आपली फसवणूक केली अशी तक्रार करण्यास नागरिक पुढे येत नाहीत. येमुल गुरूजी यांच्या विरोधात अन्य कोणत्याही तक्रारी पोलिसांकडे आल्या नाहीत. अंधश्रद्धा, बुवाबाजी च्या माध्यमातून फसवणूक झालेल्या व्यक्ती तक्रार करण्यास तयार असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांना कायदेशीर मदत निश्चित करेल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading