पहिल्या महिला चिकीत्सक डॉ. कांदबिनी गांगुली यांच्या जयंतीनिमित्त गुगलची आदरांजली
पुणे : गुगलने आज आपल्या डुडलद्वार भारतातील पहिल्या महिला चिकीत्सक डॉ. कांदबिनी गांगुली यांना त्यांच्या 160 व्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे. एक स्त्रीवादी कार्यकर्त्या, डॉक्टर आणि स्वातंत्रयसेनानी अशी त्यांची ओळख होती. हे गुगल डुडल बंगळूर येथील कलाकार ओड्रीजा यांनी तयार केले आहे.
सन 18 जुलै 1861 साली ब्रिटीश कालीन भारतातील भागलपूर येथे म्हणजेच आताच्या बांगला देशात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील महिला अधिकार कार्यकर्ते होते. महिलांना ज्यावेळी शिक्षण दुर्लभ होतं अशा काळात त्यांना शिक्षणाचे धडे दिले गेले. सन 1883 मध्ये पदवी प्राप्त करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. तर 1886 मध्ये डॉक्टरची पदवी घेऊन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळविला ज्याची इतिहासात नोंद आहे. इंग्लंडमध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत असताना त्यांनी स्त्री रोग तज्ञ म्हणून स्पेशलायसेशन केल. सन 1890 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. 3 ऑक्टोबर 1923 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. मागील वर्षी 2020 मध्ये आलेली ‘प्रथोमा कांदबिनी’ या त्यांच्या जीवनावर आधारीत मालिकेद्वारे त्या घराघरात पोहोचल्या.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण?
कांदबिनी गांगुली यांनी त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी आणि अन्य महिला डॉक्टरांच्या मदतीने महिलांसाठी वेगळी अशी चिकीत्सा पद्धती विकसीत केली होती व त्यांच्या हक्कांसाठी लढा उभा केला. आता भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? असा प्रश्न यावरून उपस्थित होतो. पण योगायोगाची गोष्ट म्हणजे गांगुली आणि जोशी या दोघींनीही 1886 सालीच डॉक्टर पदवी मिळविली होती.
(संदर्भ – गुगल )
संपादन – प्रज्ञा भोसले-पंडित
