fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNE

महागाई विरोधात स्वाक्षरी अभियान मोहिमेला सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने भाजपा सरकार निषेधार्थ घेण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियान मोहिमेला सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सर्वांनी स्वाक्षरी करून दोन शब्द मोदींसाठी च्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 2014 साली हेच मोदी सरकार 10 पैशाची पेट्रोल वाढीवर थयथयाट करायचे. पण हेच पेट्रोल चे भाव शंभरी पार गगनाला भिडले आहेत तरी चुप्पी साधून गप्प बसले आहे. यासाठी भापकर पेट्रोल पंप, सातारा रोड येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. त्यावेळी जनतेने मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला. ह्या मोहिमेचे आयोजन पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित लाजूरकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उमेश निंबाळकर, युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष विशाल मलके, पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ आम्रळे, उपाध्यक्ष आशिष व्यव्हारे , पर्वती विद्यार्थी अध्यक्ष केतन जाधव, अक्षय सागर, सुजित गोसावी,सुनिल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading