fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

शरद पवार यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी राजकीय  रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor ) यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी प्रशांत किशोर यांनी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू केले असून राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

पुढील वर्षीच्या अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक आणि 2024 मधील लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर पवार हे राष्ट्रपती पदासाठीचे विरोधी पक्षांचे सक्षम उमेदवार होवू शकतात असा विचार सुरू आहे. त्यातच विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर virodhiराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. अशावेळी सर्व पक्षांना मान्य असलेला उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच विरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम सुरू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर व पवार यांची भेट मुंबईत झाली होती. नंतर दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी काही मोठ्या नेत्यांची बैठक झाली होती त्यानंतरच हे बैठकींचे सत्र खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार  प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली आहे.

पण लोकसभेत भाजपचं बहुमत तर राज्यसभेतही भाजपचे सदस्य वाढले आहेत. अशावेळी भाजपच्या उमेदवाराला मात कशी देणार यावर रणनीती आखली जात आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांचे ममता बॅनर्जी, जगणमोहन रेड्डी, अरविंद केजरिवाल यांच्याशी असलेले चांगले संबंध उपयोगी पडतील असे चित्र आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading