मार्क वाढवून देण्याच्या आमिषाने शरीर सुखाची मागणी करण्याऱ्या शिक्षकाची धिंड

पुणे : एका नामांकित महाविद्यालयामध्ये मार्क वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार आज उघडकीस आला. यावेळी संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी सदर शिक्षकाच्या तोंडाला काळ फासलं आणि महाविद्यालया पासून विश्रामबाग पोलीसठाण्या पर्यंत धिंड काढली. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात ही शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी बारावीत शिकत आहे. ‘बारावीला मार्क वाढवून देतो आणि पैसे ही देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेव’, असे सदर आरोपी शिक्षक या विद्यार्थिनीला सांगत होता. तसेच अश्लील भाषेत तिच्यांशी संवाद ही साधत होता. या संदर्भात त्याने या विद्यार्थिनीला वारंवार फोन कॉल ही केले होते. शेवटी वैतागून या विद्यार्थिनीने या शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला व पालकांना या बाबत कल्पना दिली.  त्यानंतर आज संतत्प पालकांनी कॉलेजमध्ये धाव घेत शिक्षकाला रंगेहात पकडले.  यावेळी जमावाने या नराधम शिक्षकांच्या तोंडाला काळी शाई फासाली. तसेच विश्रामबाग पोलीसठाण्या पर्यंत त्याची धिंड काढली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: