fbpx
Sunday, May 26, 2024
BusinessLatest News

इंडियन एंटरप्राईज रिसायकलिंग मेनस्‍ट्रुअल पॅड्सने मिळवला प्रतिष्ठित सीड पुरस्‍कार

पुणे: मेनस्‍ट्रुअल पॅड्समधून पुनर्चक्रणीय साहित्‍याची निर्मिती करणा-या भारतीय स्‍टार्ट-अपला आज सीड लो कार्बन अवॉर्डसचे (सीड अवॉर्डस्) विजेते म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे. हे पुरस्‍कार युनायटेड नेशन्‍स एन्‍व्‍हायरोन्‍मेंट प्रोग्राम (यूएनईपी), युनायडेट नेशन्‍स डेव्‍हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्‍झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) यांनी केलेल्‍या जागतिक सहयोगाचा भाग आहेत.

२०१८ मध्‍ये भारतीय उद्योजक अजिंक्‍य धरिया यांनी स्‍थापना केलेले पॅडकेअरचे एनएबीएल-प्रमाणित प्रोसेसिंग युनिट पूर्णत: धूरविरहित असून आवाजरहित कार्यसंचालनाची खात्री देते. हे युनिट प्रतिदिन सेल्‍युलोज व प्‍लास्टिकमधील जवळपास ३,००० पॅड्सवर प्रक्रिया करते, ज्‍यांचे पुनर्चक्रण करता येऊ शकते. प्रत्‍येक १,००० महिलांसाठी पॅडकेअर दर महिन्‍याला लँडफिल्‍समधून ८,००० हून अधिक पॅड्स घेऊन त्‍यांना पुनर्वापर होणा-या उत्‍पादनांमध्‍ये रूपांतरित करते, ज्‍यामुळे दरमहिन्‍याला जवळपास ४० टन कार्बन डायऑक्‍साइडची बचत होऊ शकते. पुणे-स्थित पॅडकेअर शिबिरे व #ponderwithpadcare मोहिमेच्‍या माध्‍यमातून मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत देखील जागरूकता निर्माण करते. #ponderwithpadcare मोहिमेचा मासिक पाळीदरम्‍यान महिलांचे काम व शाळेमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी करण्‍याचा मनसुबा आहे. सीडच्‍या पाठबळासह पॅडकेअर युनिटची साहित्‍य हाताळण्‍याची क्षमता सुधारेल आणि प्रक्रियेसाठी येणारा खर्च कमी करेल. 

पाच भारतीय एंटरप्राईजेजना सीड अवॉर्डसचे उपविजेते म्‍हणून देखील निवडण्‍यात आहे, हे उपविजेते आहेत:

सीड इंडियाच्‍या समन्‍वयक डॉ. मालिनी बालाकृष्‍णन म्‍हणाल्‍या, ”सीडने नेहमीच महत्त्वाकांक्षी उद्योजक व स्‍टार्ट-अप्‍सना त्‍यांच्‍या ऑफरिंग्‍ज धोरणकर्ते व आर्थिक संस्‍था अशा व्‍यापक ग्राहकांना दाखवण्‍यासाठी नेहमीच प्रोत्‍साहित केले आहे. आम्‍ही भारतामधून सीड अवॉर्डस् जिंकण्‍यासाठी पेडकेअर लॅब्‍सचे, तसेच पाच उपविजेत्‍यांचे अभिनंदन करतो. मासिक पाळीदरम्‍यान स्‍वच्‍छतेची काळजी ही भारतातील गंभीर समस्‍या आहे आणि पॅडकेअरची अत्‍याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्‍पादने तरूणींमध्‍ये पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करतील. त्‍यांची विचारसरणी स्थिर आहे आणि त्‍यांच्‍यामध्‍ये प्रगती करण्‍याची मोठी क्षमता आहे.”

सीड अवॉर्डसचे विजेते पॅडकेअर लॅब्‍सचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अजिंक्‍य धरिया म्‍हणाले, ”आम्‍ही हा पुरस्‍कार मिळाल्‍याने खूपच सन्‍माननीय व आभारी आहोत. पॅडकेअर लॅब्‍सचा सस्‍टेनेबिलिटी, सेफ्टी व सोलेम्‍नीटी या ३-एस मॉडेलवर विश्‍वास आहे. आम्‍ही सर्वांगीण व स्थिर मेनस्‍ट्रुअल हायजिन मॅनेजमेंट सिस्टिम तयार केली आहे, जी वापरलेल्‍या पॅड्समधून निरूपद्रवी, पुनर्चक्रणीय उत्‍पादनाची निर्मिती करते.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading