क्रीडा शिक्षक व मित्रमंडळींनी पपई कापून केला वाढदिवस साजरा
पुणे: प्रत्येकाचा जन्मदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. वर्षभरातून येणारा हा एकच दिवस प्रत्येक जण जन्मसिद्ध हक्काप्रमाणे साजरा करतो.. भारतीय परंपरेनुसार कोणी कुटुंबातच औक्षण करून साजरा करतात तर कोणी एखाद्या रस्त्यावर निर्जन स्थळीही.. कोणी पेढे वाटून तर कोणी केक कापून.. मागील दीड वर्षात हा दिवस प्रत्येकाने घरातच साजरा केला.पण लॉकडाऊन उठताच कोरोनावरचा राग व्यक्त केल्यासारखे तरुण तरुणी पुन्हा रस्त्यावर येऊन कुठेही केक त्या व्यक्तीला भरवताना दिसताहेत.
केक न खाता त्या व्यक्तीलाच तो तोंडाला, केसांना भरवण्याचा किळसवाना प्रकार सर्रास पहायला मिळतोय.. अन्नाची नासाडी पाहवत नाही.. आणि समजा केक खाल्लाच तर मुलांमध्ये लठ्ठपणा वाढताना दिसतोय. विविध रंग, रासायनिक पदार्थ वापरून आकर्षक बनवताना अनेक भेसळीच्या घटना घडतं आहेत. हृदयविकाराला नाहक आमंत्रण दिले जातेय. या अश्या गोष्टींना टाळून बिबवेवाडीतील क्रीडा मार्गदर्शक साहेबराव जाधव, रवींद्र पवार, सुधीर जाधव, संजय वाबळे, राजेंद्र सुतार आदी मंडळींनी नवीन पद्धत शोधली आहे. हे सर्वजण वाढदिवस हा मानव सेवा दिवस व्हावा म्हणून प्रयत्न करतात. केक ऐवजी मोठी पपई किंवा कलिंगड कापून वाढदिवस साजरा करतात.. सोबत सॅलड चा आग्रह ही करतात. सर्वजण मिळून पाच किलोमीटर चालतात.अनेक वेळा ही मंडळी वृद्धाश्रमात, अंध अपंग विद्यार्थी विद्यालयात तर कधी देहू आळंदीच्या आश्रमात वाढदिवस साजरा करायला इतरांना प्रवृत्त करतात. सोबत कथाकथनाचा कार्यक्रम स्वतः मोफत सादर करतात.. समाजा तून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.. मानव म्हणून जन्म घेतलेल्या पवित्र दिवशी मानव म्हणून जगून मानवाची सेवा करा अशी काहीशी संकल्पना या दिवसाची आहे.
