भोसरी येथील वाहन चालक ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करणार- रमाकांत गायकवाड


पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय प्रशासनाचा भोसरी येथील वाहन चालक व वाहक ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, येत्या २ ऑगस्टपासून महिला प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायवाड यांनी दिली.

यामुळे भरती प्रक्रियेतील सुमारे ३ हजार चालक व वाहकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना, लॉकडाउन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुणे विभागातील ही भरती प्रक्रिया रखडली होती. याबाबत संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पुणे भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची भेट घेतली.
पुणे विभागातील दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी असलेली ही भरती प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य सरकारचा आदेश असतानाही प्रशासन हलगर्जीपणा का करीत आहे? असा सवाल दीपक मोढवे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. अखेर प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २०१९ मध्ये दुष्काग्रस्त भागासाठी चालक तथा वाहक भरती सुरू केली होती. पुणे विभागात फेब्रुवारी २०१९ मध्ये १ हजार ६४७ जणांची भरती करण्यात येणार होती. त्यासाठी एस.टी. महामंडळाने २ हजार ९८२ उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी दि. १७ जानेवारी २०२० रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यापैकी २ हजार ३०० उमेदवारांची ट्रायल झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रायल ट्रॅक बंद पडला होता. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाउनमुळे ऑगस्ट २०२० मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी भरतीला तात्पूरर्ती स्थगिती दिली होती. मात्र, दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी ही स्थगिती उठवली आहे.

भरतीवरील स्थगिती उठवल्यानंतर परिवहन महामंडळाच्या सर्वच विभागांनी भरती प्रक्रिया जिथे थांबली होती ति करण्यात येणार होती. त्यासाठी एस.टी. महामंडळाने २ हजार ९८२ उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी दि. १७ जानेवारी २०२० रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यापैकी २ हजार ३०० उमेदवारांची ट्रायल झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रायल ट्रॅक बंद पडला होता. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाउनमुळे ऑगस्ट २०२० मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी भरतीला तात्पूरर्ती स्थगिती दिली होती. मात्र, दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी ही स्थगिती उठवली आहे. भरतीवरील स्थगिती उठवल्यानंतर परिवहन महामंडळाच्या सर्वच विभागांनी भरती प्रक्रिया जिथे थांबली होती तिथून पुन्हा सुरू करणे अपेक्षीत होते. पण, पुणे विभागाने परिवहन मंत्रालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.

Leave a Reply

%d bloggers like this: