.. म्हणून धर्मयुद्ध टाळते – पंकजा मुंडे

मुंबई : माझ्या वडिलांनी ज्या लोकांसाठी संघर्ष केला, त्यांच्यासाठीच त्यांनी मला राजकारणात आणलं. त्यांच्यासाठीच मी राजकारणात आहे. त्यामुळे आपण आपलं घर का सोडायचं? राजीनामा का द्यायचा? मी कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होणारी नाहीये. भाजपमध्ये ‘राम’ राहिलेला नाही असे वाटेन तेव्हा निर्णय घेऊ तूर्तास हे धर्मयुद्ध टळाव अशी माझी इच्छा आहे. कारण या युद्धात माझे सैनिक आडवे पडतील, अशी सावध भूमिका भाजप नेत्या पंकाजा मुंडे यांनी घेतली.

 खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराज पंकजा मुंडे रविवारी (11 जुलै) दिल्लीला गेल्या होत्या. दिल्ली भेटीत पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व भागवत कराड यांची भेट घेतली. दिल्लीहून परतल्यानंतर आज (13 जुलै) त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केले.

पंकाजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती. माझा परिवार म्हणजे फक्त माझी बहीण नाही, माझा परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. मी कधीही मला अमुक द्या असं म्हटलं नाही. संघर्षयात्रेत लोकांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. मला कोणाचं नेतृत्व असणार हे माहीत होतं. मग मंत्रिपदासाठी मी राजीनामा का देईन?

पुढे पंकाजा म्हणाल्या, मी दबाव आणण्यासाठी दिल्लीला गेले, असं अनेकांनी म्हटलं. आता मंत्रिमंडळ स्थापन झालं. शपथविधी झाला. आता मी दबाव निर्माण करून काय करू? प्रीतम मुंडे पूर्णपणे सक्षम असताना त्यांना मंत्री पद नाही मिळाल. भागवत कराडांना मिळाल. माझं वय 42 भागवत कराडांचं वय 65 आहे. 65 वयाच्या माणसाचा अपमान करण्याचे माझे संस्कार नाहीत.

मी सगळं भोगलय. नको ते आरोप-प्रत्यारोप भोगले आहेत. कारण मी कोणालाच भीत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. मी निवडणूकीत हरले असले तरी खचले नाही. जर मी संपले असले तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असतील. पण माझा प्रवास अजून सुरूच आहे. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा हे माझे नेते आहेत असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: