Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा तर्फे अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड सादर

पुणे : भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या ‘अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा’ने आज आपला एक नवीन फंड ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंड’ सादर करीत असल्याची घोषणा केली. आगामी काळात व्याजदर वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने अल्पकालीन गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणुकीदारांसाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीसाठी हा ‘फ्लोटर फंड’ एक आदर्श पर्याय ठरणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन निश्चित उत्पन्न विभागाचे फंड व्यवस्थापक आदित्य पगारिया करणार आहेत. 

उच्च-गुणवत्तेची साधने आणि एए श्रेणीतील साधने यांच्या एकत्रित वापरातून या नवीन फंड योजनेची रचना तयार करण्यात आली आहे. पोर्टफोलिओच्या सरासरी मॅच्युरिटीसाठी ६ ते १८ महिन्यांचे लक्ष्य यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. हातात असलेला अतिरिक्त निधी अल्प मुदतीसाठी गुंतवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी, तसेच ‘डेट पोर्टफोलिओ’मध्ये व्याजदराच्या जोखमीवर नियंत्रण आणू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना योग्य ठरेल. 

‘फ्लोटिंग रेट’च्या साधनांचा, तसेच ‘स्वॅप’द्वारे ‘फिक्स्ड रेट’ साधनांचे रुपांतर ‘फ्लोटिंग रेट’ साधनांमध्ये करता येतील, अशा पद्धतीने व्यवस्थापित केलेला पोर्टफोलिओ ‘अ‍ॅक्सिस फ्लोटर फंडा’मध्ये आहे. ‘फ्लोटिंग रेट’चे धोरण हे व्याजदरातील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आखलेले असते. यामध्ये बाजारातील चढउताराशी संलग्न असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. सध्या व्याजाचे दर निर्णायक स्तरावर आहेत. अर्थव्यवस्थेची स्थूल मूलतत्त्वे सुधारू लागल्याने, तसेच जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ लागल्याने भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याची शक्यता पुन्हा दिसू लागली आहे. चलनवाढ जास्त असल्याने, आपण  व्याजदर चक्राच्या सर्वात तळाशी आहोत, असे आम्हाला वाटते. रिझर्व्ह बॅंक आपले अनुकूल आर्थिक धोरण मागे घेण्याची शक्यता असल्याने, बाजारपेठांनी रिझर्व्ह बॅंकेच्या कृतीस प्रतिसाद दिला असून किंमतीदेखील चढ्या प्रमाणात आहेत. 

‘अ‍ॅक्सिस एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले “अ‍ॅक्सिस एएमसीमध्ये आम्ही नेहमीच वेळेपेक्षा पुढे राहण्यावर आणि एकत्रित उत्पादने सादर करण्यावर भर देतो. त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीचे आश्वासन देणारे पर्याय उपलब्ध होतात. प्रत्येक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे साध्य करण्याच्या पद्धती भिन्न असतात, त्यांची जोखीम पेलण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि त्यासाठीचा त्यांचा कालावधीही निरनिराळा असतो. म्हणूनच आमच्या गुंतवणूकदारांच्या या विविध गरजा भागविण्यासाठी गुंतवणुकीचे विभिन्न पर्याय वैयक्तिकृत स्वरुपात आणि चातुर्याने आखण्याचे आमचे ध्येय आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading