पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 314 नवीन रुग्ण, 231 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 314 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 81 हजार 227 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 69हजार 567 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8642 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 3018 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 236 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6890
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
