महिंद्राची कृषी उपकरणे व्यवसायाची तुर्कीमध्ये पुनर्रचना
मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने त्यांची उपकंपनी अरकुंत ट्राकटर सानायी ए.एस. (अरकुंत) ही कंपनीची आणखी एक उपकंपनी असलेल्या हिसार्लर माकीना सानायी व्हे तीकॅरेत अनोनिम सिर्केती (हिसार्लर) यांच्याकडून कृषी यंत्रणा व्यवसाय हस्तगत करत असल्याचे आज जाहीर केले. विरुद्ध करारात महिंद्रा ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट कंपनी (मॉरीशस) लिमिटेड (एमओआयसीएमएल) ही कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आणि अरकुंत यांनी हिसार्लर मधला त्यांचा ९४.३ % असा संपूर्ण हिस्सा ६.६ दशलक्ष टर्किश लिरा म्हणजेच साधारणपणे ५.६ कोटी रुपयांना विकायचे मान्य केले आहे.
टर्कीमध्ये आपल्या उपकंपन्यांची पुनर्रचना करण्याचा एक भाग म्हणून महिंद्रा समूह हिसार्लरच्या मेटल फॅब्रीकेशन व्यवसायातून बाहेर पडेल. तर अरकुंत हिसार्लरचा कृषी साहित्य यंत्रणा व्यवसाय संपादन करेल. त्यामध्ये निवडक संबंधित मालमत्ता, बौद्धिक संपदा आणि ब्रँडच्या वापराचे हक्क यांचा समावेश असेल. महिंद्रा समूहाची अरकुंतच्या माध्यमातून कृषी यंत्र उत्पादनाच्या मूळ व्यवसायात म्हणजे माती नांगरण्यापासून कापणी नंतरच्या कामांसाठी गुंतवणूक सुरूच राहणार आहे. जोडीला, अरकुंत हिसार्लरचा काही निवडक केबिन उत्पादन ठेवा ताब्यात घेणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का या व्यवहाराविषयी बोलताना म्हणाले, “या व्यवहाराच्या माध्यमातून आम्ही वर्षांपासूनचा कृषी यंत्रणा हा मूळ व्यवसाय राखला आहे. यामुळे अरकुंत ट्राकटोराला पूर्णपणे कृषी साधने OEM बनवून टर्कीमधले आमचे डीलर आणि युरोप मधले ग्राहक तसेच इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहक यांना अशीच पुढे सेवा देता येणार आहे. ‘शेती हस्तांतरण, समृद्ध जीवन’ या आमच्या उद्दिष्टाला साजेसे असे हे भांडवली विभाजन आहे.”
संपादन आणि नवीन उत्पादन युनिट्स यांच्या माध्यमातून कृषी यंत्रणा व्यवसायाच्या जोडीला जागतिक पातळीवर ट्रॅक्टरची निर्मिती करणारे म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचे महिंद्राचे काम सुरूच राहणार आहे. यामध्ये आवश्यक ब्रँड आणि विक्री पायाभूत सुविधा तसेच उत्पादन विकासासाठी जागतिक पातळीवरील नेटवर्कची पत वाढविणे यांचा अंतर्भाव आहे.
