Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘बायोनीक आर्म बेस्ड ऑन इलेक्ट्रोमयोग्राफी सेन्सर’ ला प्रथम पुरस्कार

पुणे : संशोधनात्मक कलागुणांना वाव मिळावा, त्या विषयी गोडी निर्माण व्हावी आणि संशोधनाची शिस्त लागावी हा मुख्य उद्देश घेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ प्रोजेक्ट इनोवेशन २०२१’  प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. या स्पर्धेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे विद्यार्थी गायत्री दथ, आकांक्षा राणी व अभिषेक सिंग यांनी  ‘बायोनीक आर्म बेस्ड ऑन इलेक्ट्रोमयोग्राफी सेन्सर’ ला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांना २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.  

या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मेजर जनरल (निवृत्त) ताजुद्दीन म्हैसाळे, पि.वि.एस.एम.हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव आणि इंजीनियरींग विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते. तसेच, यंत्र अभियांत्रिकी संकुलचे प्रमुख प्रा.डॉ. संदीप चव्हाण, सह प्रमुख प्रा.डॉ. शिवप्रकाश बर्वे आणि प्रा. डॉ. गणेश काकांडीकर उपस्थित होते.आयोजित स्पर्धेच्या अंतीम फेरीत २० प्रकल्पांचा समावेश होता. त्यात द्वितीय पुरस्कार एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे विद्यार्थी अपूर्व गायकवड, क्षितिज अरसाद, कुणाल भावे व आकाश दिवटे यांच्या ‘डेव्हलपमेंट अँड अ‍ॅनालिसिस ऑफ एनर्जी एफिसिएंट इनोव्हेटीव्ह कूलर’, प्रकल्पास १५००० हजार रूपये आणि तृतीय पुरस्कार एमआयटी डब्ल्यूपीयूचे विद्यार्थी शिवम त्रिपाठी, रोहन पाणीकर, रूत्विक नाईक व शुभ श्रेय यांनी तयार केलेल्या ‘डिझाइन अँड डेव्हलपमेंट ऑफ ड्युअल मोटर पॉवर वेस्ट असिस्टिव्ह एक्सझोस्केलेटॉन अँड पॅसिव अँकल एक्सझोस्केलेटॉन’ प्रकल्पास प्रदान करण्यात आला.


यावेळी प्रा. ओंकार कौलगुड, प्रा. आशिष पवार, प्रा. आनंद नडगिरे, प्रा. प्रशांत पटणे, प्रा. स्पृहा ढवळे, प्रा. अभिषेक थोटे, प्रा. अरूण माली, सुलभा वाले, सुजाता बिक्कड आणि विनोद पवार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading