Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पतित पावन संघटनेच्या वतीने करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पुणे : लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतुने पतित पावन संघटना व अभिनव एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने  १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आपला  मारुती मंदिर, मीठगंज पोलीस चौकी येथे झालेल्या कार्यशाळेत डॉ गणेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनव कॉलेजचे प्राध्यापक गुरुराज गर्दे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पतित पावन संघटनेचे राजाभाऊ पाटील, मनोज नायर, गोकुळ शेलार, दिनेश भिलारे, ललित खंडाळे, राजाभाऊ राजपूत, अक्षय जंबुरे, राहुल पानसरे, आदित्य परदेशी, गणेश अभंग, महेश पाटोळे, पराग नाईक, ऋतिक कांबळे व राहुल शिंदे उपस्थित होते.

पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी एमएचसीईटी चा फॉर्म कसा भरायचा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फॉर्म भरताना  येणाऱ्या अडचणी, आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना फी संदर्भात मिळणाऱ्या सवलती याविषयी देखील सांगण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील नाईक, ध्रुव जगताप यांच्यासह राजाभाऊ रजपूत व अक्षय अभंग यांनी केले. मार्गदर्शन कार्यशाळेसाठी प्रसाद वाईकर व आकाश लोढा यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading