Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

हत्यारानिशी दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून केले जेरबंद

पुणे: पोलीस आयुक्तांनी सर्व पोलिसांना रात्रगस्त घालताना काही नवीन उपाय योजना सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे चोर आल्याची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी आरोपींकडे धारदार शस्त्रे असतानाही जिवाची पर्वा न करता दरोडा घालण्यासाठी आलेल्या सहा सराईत गुन्हेगारांपैकी दोन गुन्हेगारांना कोथरूड पोलिसांनी १ किलोमीटर पायी पळत पाठलाग करून पकडले. गुन्हेगारांकडून दरोडा टाकण्यासाठीची हत्यारे, एक तवेरा गाडी, पिवळ्या धातूचे दागिने व घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) बल्लुसिंग प्रभूसिंग टाक व २) उजालासिंग प्रभूसिंग टाक (दोघेही रा. रामटेकडी अंध शाळेच्या मागे, वानवडी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर त्यांच्या चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील शिवराय प्रतिष्ठाण शाळेजवळ असलेल्या पंचरत्न सोसायटीमध्ये दि. ५ जुलै रोजी रात्री २.२० वा.च्या सुमारास काही इसम चोरी करण्यास आले असल्याची कोथरूड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक शेळके, बीट मार्शल व इतर रात्रगस्त पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आरोपींनी बिल्डींगमधून जिन्याने खाली येऊन तिथे असलेल्या पोलिसांवर हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सुमारे एक किलोमीटर पायी पळत जाऊन वरील दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे इतर चार साथीदार मात्र पळून गेले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून बल्लुसिंग टाक याच्यावर ६३, तर उजालासिंग टाक याच्यावर ७२ असे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे दाखल आहेत
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. संजय शिंदे, परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड, कोथरूड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक शेळके, सपोफौ. सांगुर्डे,पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई सपकाळ, पोलीस शिपाई कुंभार, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई मरगळे, पोलीस शिपाई बुरले, पोलीस शिपाई गजभारे व चालक पोलीस शिपाई धादवड यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading