Wednesday, October 21, 2026
Latest NewsPUNE

Pune – बिबेवाडीत डॉक्टरांचा सन्मान

पुणे: डॉक्टर्स डे निमित्ताने पर्वती विधानसभा मतदारसंघात रविवारी परीक्षेला डॉक्टरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी रमेश सोनकांबळे, रोहित रोकडे, महेश गायकवाड, किरण लोखंडे, अभिजित नानावरे, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बिबवेवाडीतील सह्याद्री व हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पर्वती विधानसभा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षचे केतन जाधव यांनी केले होते.

केतन जाधव म्हणाले, डॉ. बी. सी. रॉयजी यांचा जन्म आणि स्मृतिदिन. त्यांच्या वैदयकीय व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर्स म्हणजे समाजाचे आरोग्य जपणारी व्यक्ती. माणूस जेवढा देवावर श्रद्धा ठेवतो तेवढा विश्वास हा डॉक्टरांवर ठेवतो. आजपर्यंत आपण सर्वांनी हा विश्वास जपला आहे. डॉक्टर हे जीवाची पर्वा न करता गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या या संकटाशी लढताना आपण सर्वजण पाहत आहोत. आज खर डॉक्टर चा सन्मान सगळ्यानि केला पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading