Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एमपीएससी विद्यार्थ्याचे आंदोलन

पुणे  – एमपीएससी करणारा स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्यानंतर स्वप्नीलला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत.पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आले आहेत.

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा आणि निकाल द्यावा,आत्महत्या केलेल्या स्वप्नील  लोणकरला न्याय द्यावा यांसह स्पर्धा परीक्षांच्या विविध प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.अनेक आंदोलनकर्त्यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर आंदोलनाला परवानगी नाकारली होती.तर सरकार आणि मंत्री विद्यार्थ्यांना न्याय देणं सोडून इतर कामात मग्न आहेत.एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय नाही दिला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला.


काल स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आखे पुणे शहर यामुळे हादरले आहे. आयोग दोन वर्षे स्पर्धा परीक्षा घेत नाही घेतली तरी जॉइनिंग काही करत नाही त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर कारवाई करून आयोगाला सरकारने स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्यायला लावतात जर ऑडिओ गाणे स्पर्धा परीक्षा लवकर व जॉइनिंग लवकर केले नाहीतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व एमपीएससी विद्यार्थ्यां तर्फे यापुढे ही आंदोलन हे अख्ख्या महाराष्ट्रभर करण्यात येईल.
अनिल ठोंबरे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading