स्‍केचर्सकडून आकर्षक रंगांमधील आरामदायी फूटवेअर सादर

पुणे :स्‍केचर्स या कम्‍फर्ट टेक्‍नोलॉजी कंपनीने नवीन व आकर्षक कलेक्‍शन स्‍केचर्स फोमीज सादर केले आहे.  हे फूटवेअर दिवसभर आरामदायी अनुभवासाठी वजनाने हलक्‍या ईव्‍हीए फोमसह डिझाइन करण्‍यात आले आहे. स्‍केचर्स फोमीज कलेक्शन  मध्ये रोजच्‍या पोशाखांना शोभेल अशा रूपात डिझाइन करण्‍यात आलेल्या सँडल्‍स व स्लिप-ऑन स्‍टाइल्‍सची श्रेणी आहे, ज्‍यामध्‍ये वॉटर-फ्रेण्‍डली वैशिष्‍ट्ये देखील आहेत.

स्‍केचर्स मान्‍सून सीझन आणि रोजच्‍या आरामदायी वेअरसाठी सादर करत आहे फोमीज स्‍केचर्स . फोमीज लोकांना दिमाखात घराबाहेर पडण्यास   प्रोत्‍साहित करतात आणि आकर्षक फूटवेअरसह आरामदायकतेचा अनुभव देतात.स्‍केचर्स फोमीज वजनाने हलके मोल्‍डेड शूज व सँडल्‍स आहेत. आरामदायी, स्‍वच्‍छ करण्‍यास सुलभ व वॉटर-फ्रेण्‍डली असलेले हे वैविध्‍यपूर्ण फूटवेअर उबदार दिवसांसाठी, तसेच मुसळधार पावसासाठी देखील योग्य आहेत.

स्‍केचर्स साऊथ एशिया प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल विरा म्‍हणाले, स्‍केचर्स एक ब्रॅण्‍ड म्‍हणून आरामदायी सुविधेसह प्रभावी लुकला संयोजित करण्‍यासाठी नेहमीच अग्रस्‍थानी राहिला आहे. आमचा विश्‍वास आहे की, आरामदायी सुविधा अस्‍सल फॅशनमधून दिसून येते आणि स्‍केचर्स फोमीज त्‍याच्‍याशीच संबंधित आहे. आमचे नवीन कलेक्‍शन आरामदायी असण्‍यासोबत मजेशीर, वैविध्‍यपूर्ण व आकर्षक आहे, ज्‍यामुळे ते विशेषत: या ऋतूमध्‍ये घराबाहेर पडताना आवश्‍यक असलेले परिपूर्ण फूटवेअर आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: