आघाडी सरकार घोटाळेबाज..अन्न व नागरी पुरवठा, पणन आणि महसूल विभागाचे 2 हजारावर कोटींचे घोटाळे- माजी मंत्री डॉ. परिणय फुके

मुंबई : आघाडी सरकारचा गैरकारभार अधिवेशनात समोर ठेवण्याच्या इराद्याने विरोधी पक्ष तयारी करुन आला मात्र विधानपरिषद सभागृहात वेळ दिला गेला नाही, म्हणून संतापलेल्या नेत्यांनी थेट माध्यमांसमोर अनेक विषय मांडले. धान खरेदीतील सुमारे 800 कोटींचा घोटाळा माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी बारकाव्यासह मांडला.

नुकताच या घोटाळ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली भंडारा इथे भव्य आंदोलन झाले, या टाळा ठोको आंदोलनात धान खरेदी केंद्रावर सुरु असलेली शेतक-यांची पिळवणूक थांबवण्याची मागणी आक्रमकपणे करण्यात आली होती. हा सर्व घोटाळा सभागृहात वेळ दिला नाही म्हणून त्यांनी माध्यमांसमोर मांडला, अन्न व नागरी पुरवठा विभागाने धानाच्या विषयात सुमारे 400 कोटींचा घोटाळा केल्याचा थेट आरोप डॉ. फुके यांनी केला. या शिवाय धान खरेदी केंद्रावर परराज्यातून आणलेल्या निकृष्ट दर्ज्याच्या धानाची खरेदी केली जाते, त्यातून आतापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

या केंद्रावर शेतक-यांना दिलासा मिळत नाही तर त्यांची आर्थिक पिळवणूक सुरु असल्याचे त्यांनी उदाहरणासह दाखवून दिले. आघाडी सरकारच कसे विदर्भातील शेतक-याला अडचणीत आणून आत्महत्येस प्रवृत्त करत आहे हे त्यांनी तपशीलवार सांगितले. या शिवाय भंडारा गोंदीया आदी जिल्ह्यात सत्ता पक्षाच्या आशिर्वादातून सुरु असलेली वाळू तस्करी तसेच इतर मागासवर्गाच्या आरक्षणाच्या मुद्दावर समाजाचे झालेल्या नुकसानीला आघाडी सरकार कसे जवाबदार आहे, याबाबतही डॉ. फुके यांनी वस्तूनिष्ठ मांडणी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: