Pune – माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग 1 मधील नागरिकांचे लसीकरण
पुणे : माता जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोफत लसीकरण पार पडले या मोफत लसीकरणाचे आयोजन भाजपचे नगरसेवक अनिल टिंगरे यांनी केले होते .महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोफत लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाघाटन केले या मोफत लसीकरण च्या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 1मधील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी व लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अनिल टिंगरे म्हणाले, 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी हे लसीकरणाच्या आयोजन करण्यात आले. विश्रांतवाडी, धानोरी येथील नागरिकांना जवळ लसीकरण केंद्र नव्हते. यामुळे मी माझ्या कार्यालयात हे लसीकरण केंद्र उभारायचे ठरवले. मी महानगरपालिके ला त्यासाठी परवानगी मागितली महानगरपालिकेने त्याला परवानगी दिली लसीकरण कसे करता येईल, गरीब नागरिकांना मोफत लसीकरणाचा मोफत लसीकरण कसे भेटेल हे मी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहर कोरोना मुक्त लवकर कसे होईल हे आमचे पहिले ध्येय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी झोपडपट्ट्या व वस्त्यांमध्ये लसीकरण हे प्रत्येक नागरिकाला भेटलेच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
