‘माणूसकीचे दूत’च्या वतीने गरजूंना धान्य वाटप

पुणे: माणूसकीचे दूत व्यासपीठाच्या वतीने दगडखाण कामगार महिला आणि कोरोना काळातील अन्य उपेक्षित, वंचितांना पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालमीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते धान्य वाटप बाजीराव रस्त्यावरील झांजले विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले. तसेच, या कोरोना काळा तील 1100 गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, इंडियन रेड क्रॉस संस्थेचे दिलीप मेहता, अनुप गुजर, राजेश लाहोटी, अखिल झांजले यांच्यासह संयोजक सारंग सराफ, साहिर शेख, जयेश कसबे, आदित्य काकडे, कपिल कासवा, संग्राम बिडलान आदी उपस्थित होते.

प्रविण परदेशी म्हणाले, माणूसकीचे दूत’च्या वतीने आयोजित या विधायक उपक्रमामध्ये पुणे शहरातील विविध दानशूर व्यक्तींनी मदत नव्हे कर्तव्य भावनेने पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.

Leave a Reply

%d bloggers like this: