Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढील आठवड्यात दक्षिण महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे: यंदाच्यावर्षी मान्सून  लवकर आला आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत मान्सूनने  दमदार हजेरी लावली. परंतु मागील तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचं संकट आलं आहे. शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्यात दिमाखात आगमन केलेल्या पावसानं मागील 20 दिवसांपासून दडी मारली आहे.

राज्यात मान्सून  दाखल झाल्यानंतर मागील 10 ते 12 दिवसात खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा वाट पहावी  लागणार आहे. आज दक्षिण कोकण   गोवा  कर्नाटक  आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटून    आले आहेत. या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस  पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील घाट परिसर, पूर्व विदर्भात  ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुणे  सातारा  सांगली  आणि कोल्हापूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या  सरी कोसळणार आहेत.
पुढील आठवड्यात तुरळक पाऊस
दक्षिण कोकण आणि घाट परिसरात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही  तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहिल. पुढील आठवड्यात 5, 6 आणि 7 जुलैला मात्र दक्षिण महाराष्ट्रासह , मराठवाडा  आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading