जयदेव गायकवाड यांच्याकडून राष्ट्रवादी शहर कार्यालयाला ५० हजार देणगी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषेदेचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्याकडून पुणे राष्ट्रवादी शहर कार्यालयाला १ महिन्याचे निवृत्ती वेतन ५० हजार रुपये देणगी म्हणून देण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. गुरुवारी दुपारी हा कार्यक्रम नवीन पक्ष कार्यालयात झाला

पंडित कांबळे ,शशिकांत तापकीर ,जयदेव इसवे ,शैलेद्र जाधव आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . ‘उपेक्षित ,तळागाळातील बहुजन यांना मानणारे संघटन हे पुरोगामी चळवळीशी जोडलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हाच पक्ष नैसर्गिकरीत्या त्यांना आपला पक्ष वाटत असला तरी हे संघटन पक्षाशी जोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत ‘असे प्रतिपादन एड जयदेव गायकवाड यांनी केले .

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,’चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल पक्षात घेतली जाईल आगामी काळात सर्व समाज पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादी कॉंग्रेस घराघरात पोहोचविण्याचे काम करण्याचा संकल्प सर्वांनी करावा .’

Leave a Reply

%d bloggers like this: