Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 286 नवीन रुग्ण, 133 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 286 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 133 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 78 हजार 803 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 67 हजार 505 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील  7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात  8594 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये  सध्या 2704 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 285 रुग्ण गंभीर आहेत. तर 422 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील  विविध केंद्रावर 6484 स्वॅब तपासण्या  करण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading