Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

निर्बंध कमी केले नाहीत तर  व्यावसाय कोलमडून पडणार; हॉटेल, दुकान व्यापाऱ्यांना भीती

पुणे:सुमारे दोन महिन्यांच्या निर्बंधांनंतर पुन्हा हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर मात करीत पुन्हा हॉटेल सुरू झाली होती. मात्र, आता वेळ कमी झाल्याने व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

हॉटेल बंद होण्याची भीतीहॉटेल व्यवसायाची सध्या सर्वच बाजूने कोंडी झाली आहे. कामावर बोलावलेल्या कामगारांना सांभाळणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, व्यवसाय कमी झाल्याने कामगार बसून असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर हॉटेल पूर्णतः बंद होण्याची भीती हॉटेल व्यावसायिक अभिजित पवार  महाराष्ट्र लोकमचं शी बोलताना व्यथा  व्यक्त केली.
माझे दुकान 2 महिने टाळेबंदी मुळे बंद होते शासनाने आता कुठे दुकाने उघडायाला परवानगी दिली होती परत शासनाने  दुकानाचा वेळ बदलाला आहे  माझा व्यवसाय संध्याकाळी 8 नंतर होतो दुकानाच्या लागणाया मालाला पैसे भरायला माझ्याकडे पैसे नाहीत.आम्ही कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करत आहोत.जर कोरोना ची तिसरी लाट जरा आली तर मला माझे दुकान पूर्णपणे बंद होण्याची भीती वाटत आहे. राज्य शासनाने असेच नियम लागू केले तर आम्हाला आमचे दुकान बंद करून दुसरा काहीतरी मार्ग निवडावा लागेल. माझे दुकान भाडेतत्त्वावर आहे
भाड तर दुकान मालक दर महिन्याला घेतोच माझ्या घरचे व मी याच व्यवसायावर अवलंबून आहे. शहरातील खाजगी कार्यालये वसरकारी कार्यालये नियमित सुरू झाले आहेत शहरातील हॉटेल व  रेस्टॉरंट यांना रात्री  11वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे

आमच्यावर खूप वाईट परिस्थिती ओढावेल आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून दुकान चालू करण्यास तयार आहोत शासनाने आमचा एकदा विचार जरूर करावा व रात्री 9 पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी द्यावी.
व्यवसायिक किराणा स्टोअर्स – राहुल डोईफोडे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading