महापौरांनी आंबील ओढा येथील रहिवाशांच्या पाठीशी उभे रहावे -डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: मुंबई शहरात मोठ्या झोपडपट्ट्या आहेत पण आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने कुठलीही  झोपडपट्टी पाडलेली नाही. आता महाराष्ट्रात पुणे महानगरपालिकेने पडलेली पहिली झोपडपट्टी आहे बिल्डरल तेथे  मोठे टॉवर उभे करायचे आहेत राज्य सरकार आणि मोठमोठे टॉवर उभे करून देणार नाही महापौरांनी कुठलेही राजकारण न करता आंबील ओढा येथील रहिवाशाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. 

आंबील ओढा परिसरातील नागरिकांनी आज डॉ. निलम गोऱ्हे यांची भेट घेतली, या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, मागच्या गुरुवारी आंबील ओढयात जी महानगरपालिकेच्या अधिकायाकडून तेथील रहिवाशांची घरे पाडली त्याची राज्य सरकार चौकशी करत आहे.  आंबील ओढा झोपडपट्टीतील ज्या रहिवाशीची घरे पाडली व मागील आठवड्यात 23 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे, त्याच्यबरोबर आज मी बैठक घेतली आहे त्या लोकांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेतलं त्यांना त्यांची घरे भेटेपर्यंत काय मदत करता येईल व आपण त्यांना त्याची घरे कधी पर्यंत येऊ शकतो  याबरोबर तेथील स्थानिक नगरसेवका सोबत चर्चा केली आंबील वाडा येथील रहिवाशांना आम्ही तुमची घरे लवकरात लवकर बांधून देऊ असे आश्वासन त्यांनी  दिले.  

Leave a Reply

%d bloggers like this: