‘बडा बिझनेस’ चा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीशी सहकार्य करार

पुणे : ‘बडा बिझनेस’ या डॉ विवेक बिंद्रा यांच्या शैक्षणिक आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यासपीठासोबत कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीने सहकार्य करार केला आहे.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’चे संस्थापक राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘बडा बिझनेस’चे शैक्षणिक प्रकल्प आणि संशोधन प्रकल्पांमध्ये कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचा सहभाग आणि मार्गदर्शन असणार आहे.या सहकार्य करारानुसार विद्यार्थ्यांना ३०० शैक्षणिक व्हिडीओ,स्वतःचे परीक्षण करण्याच्या सुविधा,विविध यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे,असे राकेश मित्तल यांनी सांगितले.

‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी’ ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असून किंगडम ऑफ टोंगा मध्ये २०१४ मध्ये स्थापना झाली आहे.स्थापना प्रमाणपत्र नोव्हेंबर २०१४ मध्ये प्राप्त झाले असून किंगडम ऑफ टोंगाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. युनिव्हर्सिटीला इंटरनॅशनल एक्रिडिटेशन ऑर्गनायझेशन(अमेरिका) ने प्रमाणित केले आहे.मॅनेजमेंट,बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन,आंत्रप्रेनरशिप,कॉम्प्युटर ऍप्लिकेशन,इकॉनॉमिक्स विषयातील अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. संशोधनासाठी मार्गदर्शन केले जाते. संस्थेला इंटरनॅशनल एज्युकेटर या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: