Pune – महापालिके समोर कचरा वेचकांच्या सन्मानासाठी आंदोलन

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या उदासीन कारभारा विरोधात कचरा वेचकांनि विविध मागण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमोर ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

या आंदोलनास खासदार सुप्रिया सुळे, सुमन मोरे, सुरेखा गाडे, लक्ष्मीनारायण पूर्णमासी यांच्या संख्येने कचरावेचक या आंदोलनास उपस्थित होते.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव म्हणाले,
नागरिक ओला व सुका कचरा एकच करतात आपल्या घराच्या कचराकुंडी मध्ये ठेवतात कोरोना
काळात सगळे बंद असताना कचरा वेचक महिला
कचरा गोळा व साफ करून महानगरपालिकेच्या कचरा गाडीत ठेवायच्या दोन वर्षे महापालिकेने
कचरा वेचक महिलांना पगार वाढवून दिला नाही त्यांच्या विविध मागण्यांकडे महानगरपालिका लक्ष देत नाही मी आजपर्यंत गरीब लोकांना भरपूर मदत केली त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले कचरा वेचक महिलांच्या मागण्या जर महानगरपालिकेने जर सोडवल्या नाहीत येथील पुढील काळात हे आंदोलन असेच चालू राहील.

कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्ष सुमन मोरे म्हणाल्या की, पुणे शहरातील कचरा वेचकांकडे पुणे महापालिकेचे दोन वर्षा पासून लक्ष नाही.  शहरातील कचरावेचकांच्या योगदानाला महत्त्व दिले जात नाही  होळीच्या काळात पूर्ण क्षमतेने काम करून सुद्धा कचरावेचकांना गरजेचे सुरक्षा साहित्य, आयुर्विमा वैद्यकीय आणि प्रोत्साहन भत्ता  मिळाले नाही. आमच्या हक्कासाठी व सन्मानासाठी  आम्ही सर्वजण शांतीपूर्ण मार्गाने लढणार आहोत म्हणून आज आम्ही आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करत आहोत.

कचरावेचकांच्या मागण्या
1) पुण्यातील  700मान्यताप्राप्त कचरा वेचक कांच्या जीवन अपंगत्व विमाच्या हप्ता भरणे
2) वस्तीतील प्रत्येक घरामागे रुपये 30 प्रत्येक घर वस्ती घरामागे रुपये 10 कोव्हिड प्रोत्साहन भत्ता तातडीने मंजूर करणे व कचरा वचकांना देणे
3) स्वच्छ सेवा  सहकारी संस्थेसोबत कराराचे 10
वर्षासाठी नूतनीकरण करणे
4) कचरा  वेचकानी  उभा केलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या उपक्रमासाठी साहित्य व पायाभूत सुविधा उपलब्ध करणे
5) वेळेवर कचरा वेचकाना ओळखपत्र देणे
6) स्वच्छ कचरा वेचकांना कचरा संकलनासाठी साहित्य व सुरक्षा साहित्य पुरवणे
7) सहा महिने कर वाडीच्या चर्चा केल्या जातात मात्र सर्व कचरा वाचकांच्या फायद्याचे दीर्घकालीन निर्णय का घेतले जात नाहीत.

Leave a Reply

%d bloggers like this: