पुणे जिल्ह्यात जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात 177 मिलिमीटर पाऊस
पुणे : पुणे जिल्ह्यात जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात 177 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या तुलनेत 98टक्के इतके आहे. जून महिन्यातील सरासरी पाऊस 180 मिलिमीटर इतका आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 678मिलिमिटर पाऊस वेल्हे तालुक्यात तर, सर्वांत कमी केवळ 90 मिलिमिटर पाऊस हा इंदापूर तालुक्यात झाला आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी 1 जूनपासून पावसाची नोंद केली जाते. या नोंदीनुसार 1जून ते 21 जून या पहिल्या तीन आठवड्यातच जून महिन्यातील सरासरी पावसाच्या 98टक्के पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.
जून महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये (कंसात सरासरी पाऊस) भोर – 253 (303), वेल्हे – 482(530), खेड – 190 (123), आंबेगाव – 56उ (123, जुन्नर – 100 (456), शिरूर – 678 (70), पुरंदर -789 (890), दौंड – 678 (67), बारामती – 100 (86) आणि इंदापूर – 87 (105).पुणे जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पाऊस हा 890मिलिमीटर इतका आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात 1जून ते 17 आक्टोबर या कालावधीत प्रत्यक्षात 2हजार 40 मिलिमीटर पाऊस झाला होता. एकूण पावसाचे हे प्रमाण सरासरी पावसाच्या 424 टक्के इतके नोंदले गेले होते, असेही बोटे यांनी सांगितले.
