Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘आर्या’ सीजन २ ……. लवकरच

सस्पेन्स , ड्रामा, थ्रीलर आणि सुष्मिता सेनच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली वेबसिरीज म्हणजे ‘आर्या’. लोकडाऊनच्या काळात सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी आर्या हीच वेबसिरीज होती. आता या वेबसीरजचा दुसरा सीजन येत आहे.  स्वतः सुष्मिता सेनेनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करीत ही माहिती दिली.

या पोस्टमध्ये सुष्मिताने आरश्यात पाहातानाचा आर्याचा फोटो शेयर केला असून “ती आरश्यात वादळांना येताना पाहत आहे… आर्या सीजन २ “अशी कॅप्शन दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने वेबसिरीजचे दिग्दर्शक राम माधवानी यांनाही टॅग करीत “चला पुन्हा एकत्र  प्रोजेक्ट करुयात” असे म्हटले आहे. यावर माधवानी यांनी “आर्याचे पुन्हा एकदा स्वागत” असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आर्या सीजन २चे चित्रीकरण सध्या सुरू असून लवकरच ती हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, सुष्मिता सेनने आर्या मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केल होतं. या वेबसिरीजसाठी तिला ‘बेस्ट एक्ट्रेस फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड’ ही मिळाला आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading