fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNE

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातर्फे अवघ्या पाच रुपयांत मिळणार रोप

पुणे : महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण आणि उद्यान विभागातर्फे देशी झाडांना प्रोत्साहन देण्यासाठी जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात १५ ऑगस्टपर्यंत अवघ्या पाच रुपयांत कोणतेही रोप नागरिकांना घेता येणार आहे. उद्यान विभागातर्फे दरवर्षी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
या वनमहोत्सवाअंतर्गत विविध झाडांच्या रोपांची अल्पदरात विक्री होण्यासह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वृक्षप्रेमींना वनमहोत्सवाविषयी मोठे औत्सुक्य असते. गेल्यावर्षी हा वनमहोत्सव झाला नसला तरी यंदा कोरोना सुरक्षेची सर्व काळजी घेऊन या वनमहोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी महाराज उद्यानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत सोमवार ते शनिवार-सकाळी ८ ते दुपारी ४, रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रोपे विकत मिळतील.
संजय कांबळे संभाजी उद्यान कामगार

“रोप लागवड, हिरवाईवर भर, टेकड्यांवर रोप लागवड, रस्त्यांच्या कडेने झाडे लावणे यासारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते.”
चैतन्य गोडसे हॉर्टिकल्चरल मिस्त्री.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading