fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राष्ट्रमंचच्या बॅनरखाली शरद पवारांनी उद्या बोलावली 15 विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली : शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता सक्रीय झालेले आहेत. सध्या ते दिल्लीत असून उद्या (दि. 22)  दुपारी 4 वाजता त्यांच्या  निवासस्थानी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ‘राष्ट्रमंच’ या बॅनरखाली ही बैठक होणार असून यामध्ये 15 पक्षांचे नेते सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार विरोधात मोट बांधण्यासाठी तसेच भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी या बैठकीत चर्चा केली जाईल. काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. शरद पवार येत्या 23 जूनपर्यंत  दिल्लीत असणार आहेत. त्यामुळे इतरही आणखी बैठका होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading